बुधवारी गणरायाची कृपा कोणावर असणार? वाचा मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य
आजचे राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२६ नुसार आजचा दिवस बुधवार असून हा दिवस श्री गणेशाला समर्पित मानला जातो. या दिवशी भाविक गणपतीची मनोभावे पूजा-अर्चा करतात आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रार्थना करतात. ग्रहांच्या बदलांमुळे सर्व १२ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मेष ते कर्क राशींचे आजचे राशीभविष्य
- मेष रास (Aries): आजचा दिवस सकारात्मक फलदायी ठरेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. भविष्यासाठी नवीन योजना आखाल आणि ध्येयपूर्तीसाठी कुटुंबाची उत्तम साथ लाभेल.
- वृषभ रास (Taurus): कलागुणांना उत्तम वाव मिळेल आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. समाजात मान-सन्मान वाढेल तसेच मित्रांच्या सहकार्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
- मिथुन रास (Gemini): आजचा दिवस अतिशय शुभकारक आहे. तुमच्या पराक्रमाला आणि कौशल्याला विविध क्षेत्रांतून दाद मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
- कर्क रास (Cancer): व्यवसायाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस प्रगतीचा आहे. गणरायाच्या कृपेने संभाव्य संकटे टळतील आणि दिवसभर उत्साही वातावरण राहील.
सिंह ते वृश्चिक राशींचे आजचे राशीभविष्य
- सिंह रास (Leo): आजचा दिवस लाभदायी ठरेल. कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील.
- कन्या रास (Virgo): नशिबाची उत्तम साथ लाभेल. आर्थिक संपत्तीत वाढ होईल, धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि प्रेमाच्या बाबतीत अनुकूलता राहील.
- तूळ रास (Libra): कामाच्या व्यस्ततेमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाईल. प्रवासाचे योग जुळून येतील, मात्र आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- वृश्चिक रास (Scorpio): कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि नातेवाईकांकडून शुभ बातम्या मिळतील. रखडलेली कामे सुरळीत पार पडतील.
धनु ते मीन राशींचे आजचे राशीभविष्य
- धनु रास (Sagittarius): आज सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शत्रूंचा त्रास संभवतो, त्यामुळे कामात दिरंगाई करू नका. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.
- मकर रास (Capricorn): शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे, धनहानीचे संकेत आहेत. व्यवसायात मोठी तेजी-मंदी नसेल, स्थिती मध्यम राहील.
- कुंभ रास (Aquarius): दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल, परंतु नंतरच्या काळात मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. विचारांची गोंधळलेली स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मीन रास (Pisces): आर्थिक स्थिती चांगली असली तरी पैशांचा अपव्यय टाळावा. व्यवहाराच्या बाबतीत सतर्क राहा. वैवाहिक आयुष्यातील मतभेद दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 09-09-2026














