
जे.के. फाईल्स ते गद्रे मरीन दरम्यानचा १,८०० मीटर रस्ता होणार चकाचक; मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Mirjole MIDC Road Four Laning मुळे रत्नागिरी शहर आणि औद्योगिक क्षेत्रातील दळणवळणाला मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील जे.के. फाईल्स ते गद्रे मरीन कंपनीपर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असताना, आता या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. हा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीत जाण्यासाठी जे.के. फाईल्स हा मुख्य मार्ग आहे. मुसळधार पाऊस आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून दुरुस्तीची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत सुमारे अठराशे मीटर अंतराच्या या रस्त्याचे पूर्ण काँक्रीटीकरणासह चौपदरीकरण केले जात आहे. सध्या पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन आणि विजेच्या वाहिन्या हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Mirjole MIDC Road Four Laning Features : स्मार्ट सिटी आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास
या चौपदरीकरण प्रकल्पात आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे:
- काँक्रीटीकरण व दुतर्फा विकास: रस्त्याचे पूर्ण काँक्रीटीकरण केले जाणार असून दोन्ही बाजूंना पक्के फुटपाथ आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधली जातील.
- आकर्षक दुभाजक व प्रकाशयोजना: रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या डिव्हायडरवर आकर्षक झाडे लावली जाणार असून modern स्ट्रीट लाईट्स (विद्युत दिवे) बसवण्यात येतील.
- महत्त्वाच्या संस्थांसाठी सोयीचा मार्ग: या मार्गावरून जागतिक पातळीवर सी-फूड निर्यात करणाऱ्या गद्रे मरीनसह इतर मरीन कंपन्यांची वाहतूक होते. तसेच तटरक्षक दल (Indian Coast Guard), अभियांत्रिकी व पदवी महाविद्यालय आणि नव्याने होत असलेल्या रत्नागिरी विमानतळाला जोडणारा हा मुख्य जोडरस्ता ठरणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी रस्ते सुस्थितीत करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या मिरजोळे एमआयडीसीतील सुमारे ९० टक्के रस्ते उत्तम स्थितीत असून, हा मुख्य रस्ता विकसित झाल्यानंतर ‘स्मार्ट सिटी’ आणि पर्यटनदृष्ट्या विकसित रत्नागिरीच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. पावसाळा संपल्यानंतर या कामाचा वेग आणखी वाढवला जाईल, अशी माहिती कंत्राटदार आणि एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 10-09-2026













