गेल्या ४ महिन्यांत ६ रुपयांनी वाढ; रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहनधारकांना आर्थिक फटका
Dapoli CNG Price Hike News मुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे आणि स्थानिक वाहनधारकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर दापोली तालुक्यात सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून, दर आता ९२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. दर वाढल्याने प्रवाशांच्या प्रवास खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चार महिन्यांपूर्वी दापोलीत सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलो होता. त्यानंतर काही कालावधीत वाढ होऊन तो ९० रुपयांवर पोहोचला. आता पुन्हा २ रुपयांची वाढ करण्यात आल्याने हा दर ९२ रुपये प्रतिकिलो झाला आहे. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत ६ रुपयांची वाढ झाल्याने वाहनचालकांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
Dapoli CNG Price Hike News Impact : गणेशोत्सवातील प्रवासावर आणि भाड्यावर होणार परिणाम
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई, पुणे व इतर शहरांमधून मोठे चाकरमानी खाजगी वाहनांसह दापोलीत दाखल होत आहेत. सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे त्यांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे:
- रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीची शक्यता: इंधनाचे दर वाढल्याने वाहन चालवण्याचा खर्च वाढत आहे, त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- स्थानिक वाहतुकीवर ताण: दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना तसेच खाजगी वाहनचालकांना या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 10-09-2026














