कर्ली-रावंगणवाडी येथील दुर्घटना; देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
Deorukh Poison Suicide Case News मुळे संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्ली-रावंगणवाडी येथील एका २३ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याच्यावर कोल्हापूर येथील सी.पी.आर. (CPR) रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. आशिष दिपक रावंगण (वय २३, रा. कर्ली, रावंगणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष रावंगण याने २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी २८ ऑगस्ट रोजी १०८ रुग्णवाहिकेने त्याला कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले होते.
Deorukh Poison Suicide Case News Police Registration : देवरूख पोलिसांकडून तपास सुरू
कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज सुरू असतानाच ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान आशिषचा मृत्यू झाला.
या घटनेची अधिकृत नोंद देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. या तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून देवरूख पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 10-09-2026














