Ganpati Aagman Ratnagiri: गणपती आगमनापूर्वी रत्नागिरी शहरातील खड्डे बुजणार; रस्त दुरुस्तीचे काम दिवस-रात्र सुरू

जयस्तंभ, एसटी स्टॅण्ड आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रस्ते पूर्ववत; उर्वरित भागांत कामाला वेग

रत्नागिरी:

गणपती आगमनापूर्वी रत्नागिरी शहरातील खड्डे प्राधान्याने बुजवले जातील, असा विश्वास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार गारवे यांनी व्यक्त केला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची व भाविकांची वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सध्या दिवस-रात्र पातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रमुख सार्वजनिक चौक आणि वर्दळीच्या मार्गांना या कामात प्राधान्य दिले जात आहे.

रत्नागिरी शहरातील वाहतुकीचे मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या जयस्तंभ परिसर, मध्यवर्ती एसटी स्टॅण्ड मार्ग, सिव्हिल हॉस्पिटल रस्ता आणि माळनाका परिसरातील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या टप्प्यांवरील रस्त्यांची दुरुस्ती झाल्यामुळे रुग्णवाहिका, प्रवाशी बस आणि स्थानिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील उर्वरित भागांमधील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल होतात. या काळात रस्त्यांवर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येचा विचार करता, सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 11-09-2026