जयगडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन: एकावर गुन्हा दाखल

जयगडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन: एकावर गुन्हा दाखल

जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी रस्त्यावर पोलिसांची कारवाई; जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीवर जयगड सागरी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून उपद्रव पसरवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाडाखाली बसून मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली बसून संशयित मद्यप्राशन करत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला.

Rotery school

विनापरवाना मद्यप्राशन

कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश यशवंत पावरी (वय ५५, रा. बागवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे. पावरी हे सार्वजनिक ठिकाणी बसून ‘इम्पिरियल ब्लू’ कंपनीची १८० मिली क्षमतेची दारूची बाटली पित असताना आढळले. त्यांच्याकडे मद्यप्राशनाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.