रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई; रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे इतर वाहनांसह पदचाऱ्यांना अडथळा
रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी फाटा, खेडशी येथे सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
सार्वजनिक रस्त्यावर कार उभी केल्याने धोका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक दुर्गेश शेषराम धुर्वे (वय ३८, रा. पुष्पेन्द्र सिटी, सावित्री सदन बंगला, महालक्ष्मी) यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी कार (RJ 27 UC 1241) कारवांचीवाडी फाटा, खेडशीजवळ मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच पदचाऱ्यांना मोठा अडथळा व धोका निर्माण झाला होता.
रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुर्गेश धुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.













