गुहागर : भातगाव येथे १६ सप्टेंबरला गणेशमूर्ती विसर्जन तलावाचे लोकार्पण; पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

गुहागर : भातगाव येथे १६ सप्टेंबरला गणेशमूर्ती विसर्जन तलावाचे लोकार्पण; पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

गुहागर तालुक्यातील भातगाव गोळेवाडीत सोहळा; विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण

गुहागर तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथे बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या शुभहस्ते या विसर्जन तलावाचे लोकार्पण होणार आहे.

अनेक मान्यवर राहणार उपस्थित

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते उपस्थित राहणार आहेत.

तसेच गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोलीचे चेअरमन रामचंद्र हमणे गुरुजी, व्हाईस चेअरमन तुकाराम निवाते, पंचायत समिती सदस्या सुचिता घाणेकर, शिवसेना तवसाळ गट अध्यक्ष प्रदीप सुर्वे, शिवसेना युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर काजरोळकर, स्वीय सहाय्यक विजय मोहिते आणि महिला आघाडीच्या रेणुका आंग्रे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भातगाव परिसरातील नागरिकांसाठी आणि गणेशभक्तांसाठी हा विसर्जन तलाव अत्यंत सोयीचा ठरणार असून ग्रामस्थांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.