डेरवणमधील क्रॉस कंट्री स्पर्धेत धावले ७०० धावपटू; विविध वयोगटांत शेंबेकर, मुळे, साळुंखे, वास्के, गाडे, उपशोटे, ताटे, गोंडाळ यांना विजेतेपद

डेरवणमधील क्रॉस कंट्री स्पर्धेत धावले ७०० धावपटू; विविध वयोगटांत शेंबेकर, मुळे, साळुंखे, वास्के, गाडे, उपशोटे, ताटे, गोंडाळ यांना विजेतेपद

एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स ॲकॅडमी व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचा उपक्रम; गुणवंत खेळाडूंना ५५ हजारांची रोख पारितोषिके

एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स ॲकॅडमी, डेरवण यांच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित बारावी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून आलेल्या ७०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या धावण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवले.

उद्घाटन सोहळा आणि पारितोषिक वितरण

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास फिटनेस व स्ट्रेंथ तज्ज्ञ तपन वैद्य, श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणवली, शैक्षणिक संचालिका शरयू यशवंतराव, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गालवणकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे उपस्थित होते. सर्व आठही वयोगटांतील प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

विविध वयोगटांतील विजेते खेळाडू:

१२ वर्षांखालील मुलगे: प्रणम्य शेंबेकर (चिपळूण) प्रथम, कैवल्य भोवारे (चिपळूण) द्वितीय, हर्षल गंभीरे (चिपळूण) तृतीय, सार्थक करेशद (सातारा) चौथा व साहिल चव्हाण (लांजा) पाचवा.

१२ वर्षांखालील मुली: ईश्वरी मुळे (कराड) प्रथम, प्रांजल घुमे (संगमेश्वर) द्वितीय, श्रावणी मोरे (लांजा) तृतीय, ऋतुजा पानगले (चिपळूण) चौथा आणि आरोही शीतप (गुहागर) पाचवा.

१४ वर्षांखालील मुलगे: श्रावण साळुंखे (कराड) प्रथम, समर्थ सुर्वे (कराड) द्वितीय, राज यादव (कराड) तृतीय, आयुष जाधव (चिपळूण) चौथा व जय भुवड (चिपळूण) पाचवा.

१४ वर्षांखालील मुली: अबोली वास्के (कराड) प्रथम, आराध्या वास्के (कराड) द्वितीय, ईश्वरी गरुड (कराड) तृतीय, चिन्मई शिगवण (गुहागर) चौथा व इच्छा राजभर (चिपळूण) पाचवा.

१६ वर्षांखालील मुलगे: वैभव गाडे (सांगली) प्रथम, कृष्णा वाडकर (कराड) द्वितीय, हिमांशू सालोदे (सांगली) तृतीय, गणराज धोत्रे (सातारा) चौथा व रोहन राठोड (चिपळूण) पाचवा.

१६ वर्षांखालील मुली: स्वरा उपशोटे (लांजा) प्रथम, रिद्धी भलेकर (चिपळूण) द्वितीय, सान्वी सुर्वे (रत्नागिरी) तृतीय, अक्षया कोळंबेकर (रत्नागिरी) चौथा व वैदेही जंगम (चिपळूण) पाचवा.

१८ वर्षांखालील मुलगे: अथर्व ताटे (सातारा) प्रथम, सागर शर्मा (सांगली) द्वितीय, आयुष बर्जे (दापोली) तृतीय, प्रज्वल येडगे चौथा व मयूर सोयान पाचवा.

१८ वर्षांखालील मुली: रिया गोंडाळ (कराड) प्रथम, राणी गावडे (कराड) द्वितीय, आर्‍या डोर्लेकर (रत्नागिरी) तृतीय, रिद्धी चव्हाण (रत्नागिरी) चौथा व सिमरन पवार (संगमेश्वर) पाचवा.