खेड : परशुराम घाटात गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणावर खेड पोलिसांची कारवाई; २४ वर्षीय तरुणावर गुन्हा

खेड : परशुराम घाटात गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणावर खेड पोलिसांची कारवाई; २४ वर्षीय तरुणावर गुन्हा

एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदएनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद

खेड : परशुराम घाटाजवळील एका हॉटेलच्या तळमजल्यावर बेकायदेशीररीत्या गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणास खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ‘अमली औषधी द्रव्य व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) अंतर्गत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक कुमार रमन यादव (वय २४, सध्या रा. हॉटेल शिवसागर, परशुराम घाटाजवळ, ता. खेड, जि. रत्नागिरी; मूळ रा. चकला, ता. बनमनखी, जि. पूर्णिया, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

हॉटेलच्या तळमजल्यावर आढळला गांजा पिताना

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम घाटाजवळील हॉटेल शिवसागरच्या तळमजल्यावर संशयित आरोपी अभिषेक यादव हा गांजाचे सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अशोक विठ्ठल मुंडे यांनी खेड पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी खेड पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.