CNG Shortage in Ratnagiri: सणासुदीत सीएनजीचा तुटवडा; सीएनजीसाठी पंपांवर रांगाच रांगा

CNG Shortage in Ratnagiri: सणासुदीत सीएनजीचा तुटवडा; सीएनजीसाठी पंपांवर रांगाच रांगा

चाकरमान्यांबरोबरच दररोजचे प्रवासी, पर्यटकांची होतेय गर्दी; चारचाकी, रिक्षा चालक तासनतास रांगेत राहतात उभे

CNG Shortage in Ratnagiri मुळे रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या ऐन सणासुदीत शहरासह ग्रामीण भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवामुळे लाखो चाकरमानी, पर्यटक आणि दररोजचे प्रवासी जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएनजी गॅसची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून चारचाकी आणि रिक्षा चालकांना सीएनजी भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन आणि पंप चालकांनी योग्य नियोजन न केल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, प्रवाशांसह स्थानिक रिक्षाचालक, नोकरदार आणि पर्यटक प्रचंड हैराण झाले आहेत.

CNG Shortage in Ratnagiri मुळे वाहनचालकांची होणारी परवड

गणेशोत्सव सणाला प्रत्येक कोकणकर हमखास आपल्या मूळ गावी येतो. काहीजण रेल्वे आणि एसटीचा आधार घेतात, तर अनेक चाकरमानी स्वतःच्या चारचाकी वाहनाने कोकणात दाखल होतात. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात सीएनजीचा तुटवडा होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही एन सणासुदीत सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना १ ते २ किलोमीटर अंतरापर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर चालकाचा नंबर आला असता ‘सीएनजी संपल्याचा’ बोर्ड पाहून चारचाकी आणि रिक्षा चालक पुरते वैतागले आहेत.

रत्नागिरी, हातखंबा, पालीसह विविध सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली आणि लांजा या भागांतील स्थानिक रिक्षाचालकांना या तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी शहरातील माळ नाका, एमआयडीसी जे. के. फाईल्स, हातखंबा, नाचणे, चिपळूण, खेड येथील एमजीएल, लांजा आणि पाली यासह विविध ठिकाणी असलेल्या सीएनजी पंपांवर सध्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा दिसून येत आहेत.

गॅस पुरवठ्याबाबत प्रतिक्रिया देताना चारचाकी चालक समीर पाटील म्हणाले, "गणेशोत्सवामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात येणार असल्याचे माहीत असूनसुद्धा प्रशासनाच्या वतीने सीएनजी पंपांवर मुबलक साठा ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे होत नाही. कधी पुरवठा सुरू असतो तर कधी गॅस बंद असतो. चारचाकी व रिक्षांची वर्दळ वाढल्याने पंपांवर गर्दी होत असून, पंपचालकांनी याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे."