Chiplun Table Tennis Tournament: डेरवण येथे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न; ६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

Chiplun Table Tennis Tournament: डेरवण येथे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न; ६० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

विजेत्या खेळाडूंची मालवण येथील प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड; आंतरराष्ट्रीय सुविधांमुळे खेळाडू समाधानी

Chiplun Table Tennis Tournament डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकतीच जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या ६० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या वयोगटात हे सामने खेळवण्यात आले. विशेषतः १७ आणि १९ वर्षांखालील गटातील सामने अत्यंत अटीतटीचे व रंगतदार झाले.

Chiplun Table Tennis Tournament मधील विजेते खेळाडू

विविध वयोगटांतील अंतिम सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:

१५ वर्षांखालील मुलगे: विधीत सकपाळ (विजेता), कुलदीप गोऱ्हारे (उपविजेता), चिन्मय चव्हाण (तृतीय).

१७ वर्षांखालील मुलगे: अर्णव दळी (प्रथम), वेदांत सुर्वे (द्वितीय), अधिराज तावडे (तृतीय).

१७ वर्षांखालील मुली: पायल बोनबोरे (विजेती), अनिष्का महाडिक (उपविजेती), विजयश्री चव्हाण (तृतीय).

१९ वर्षांखालील मुलगे: चिन्मय माजुरकर (सुवर्णपदक), वेदांत सुर्वे (रौप्यपदक), अधिराज तावडे (कांस्यपदक).

१९ वर्षांखालील मुली: सुहाना भडवळकर (प्रथम), दीक्षा मोरे (द्वितीय), धृवी घाणेकर (तृतीय).

प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड आणि पारितोषिक वितरण

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गालवणकर, प्रशिक्षक राकेश खांडेकर, सोमनाथ सुरवसे आणि प्रदीप यादव उपस्थित होते. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे होणाऱ्या प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलातील उत्कृष्ट टेबल, प्रकाशयोजना आणि आधुनिक सोयीसुविधांमुळे सामने अत्यंत दर्जेदार झाले, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेता चिन्मय माजुरकर आणि क्रीडा शिक्षक राकेश खांडेकर यांनी व्यक्त केली.