Gaur Terror in Sangameshwar: आंबव पोंक्षे गावात गव्याचा वावर; शेतीचे अतोनात नुकसान आणि ग्रामस्थ धास्तावले

Gaur Terror in Sangameshwar: आंबव पोंक्षे गावात गव्याचा वावर; शेतीचे अतोनात नुकसान आणि ग्रामस्थ धास्तावले

मुख्य रस्त्यांवर गव्यांचे कळप; वन विभागाच्या दुर्लक्षावर सरपंच शेखर उकार्डे आक्रमक

Gaur Terror in Sangameshwar मुळे संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावातील ग्रामस्थ अत्यंत भीतीखाली वावरत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून गावातील तुळसणीच्या सीमेकडे असलेल्या पकडेवाडी आणि भुवडवाडी परिसरात गव्यांचे कळप येत होते. मात्र, गेल्या वर्षापासून या गव्यांनी थेट भातशेतीत उतरून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. गव्यांमुळे तालुक्यात सतत होणारे अपघात आणि पिकांच्या नासधुशीमुळे शेतकरी व नागरिक हैराण झाले असून संपूर्ण गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Gaur Terror in Sangameshwar मुळे शेती अन् आंबा-काजू बागा उध्वस्त

गवा हा पूर्णतः शाकाहारी व तृणभक्षी प्राणी असल्याने तो गवत, भातशेती आणि इतर पिकांकडे सहज आकर्षित होतो. एका गव्याचे वजन तब्बल ८०० ते १५०० किलोपर्यंत असते. विशाल काय आकार आणि मोठ्या आहारामुळे गवे शेतात शिरल्यास भातशेतीसह पावटा, कडवा, कुळीथ यांसारख्या सर्व पिकांची नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसून, नव्याने लावलेल्या आंबा व काजूच्या रोपांचीही गव्यांकडून मोठी हानी केली जात आहे.

रस्त्यांवर गव्यांचे दर्शन आणि सुरक्षेचा प्रश्न

आता हे गवे केवळ शेतापुरते मर्यादित न राहता आंबव पोंक्षे-सरंद आणि आंबव पोंक्षे-आरवली या मुख्य रस्त्यांवर अचानक येऊ लागले आहेत. याच मुख्य मार्गांवरून शाळकरी मुले रोज पायी ये-जा करतात. अशा वेळी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

वन विभागाला या गंभीर समस्येबाबत सातत्याने कल्पना देऊन आणि तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा थेट आरोप आंबव पोंक्षे गावचे सरपंच शेखर उकार्डे यांनी केला आहे. वन विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.