युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपली कल्पना मांडण्याची संधी; १२,८०० युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

Viksit Bharat Quiz Registration च्या अंतर्गत ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७’चा प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात १७ ते ३० सप्टेंबर दरम्यान ‘माय भारत पोर्टल’वर (MY Bharat Portal) विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १५ ते २९ वयोगटातील तब्बल ४ हजार १११ युवक-युवतींनी नोंदणी केली आहे. पाच टप्प्यांत होणाऱ्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
Viksit Bharat Quiz Registration: स्पर्धेचे टप्पे अन् मुख्य वैशिष्ट्ये
रत्नागिरीतील आरोग्य मंदिर येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सम्राट पाटील यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेस महेश लोणकर उपस्थित होते.
स्पर्धेचे वेळापत्रक:
जिल्हास्तरीय स्पर्धा: १० ते १६ सप्टेंबर
राज्यस्तरीय स्पर्धा: १७ सप्टेंबर ते ७ डिसेंबर
राष्ट्रीय स्पर्धा: १० ते १२ जानेवारी (दिल्ली येथे)
पंतप्रधानांसमोर कल्पना मांडण्याची संधी: पाच टप्प्यांतील स्पर्धेनंतर निवड झालेल्या युवकांना नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय विकसित भारत नेतृत्व संवादा’त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या संकल्पना मांडण्याची थेट संधी मिळणार आहे.
निबंध स्पर्धा: प्रश्नमंजुषेतील सर्वोत्तम १० टक्के सहभागी पुढील भारत निबंध स्पर्धेसाठी पात्र ठरतील. त्यांना ‘माय भारत पोर्टल’द्वारे ५०० शब्दांचा निबंध सादर करावा लागेल.
विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन
या उपक्रमात क्विझ व्यतिरिक्त लोकनृत्य, लोकसंगीत, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन, ‘डिजाइन फॉर भारत’, ‘हॅक फॉर सोशल कॉज’, युवा उद्योजक चॅलेंज आणि शेवटी युवा संसदेचा समावेश आहे. जिल्ह्याला १२ हजार ८०० युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट देण्यात आले असून शाळा-महाविद्यालयांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे.













