Guhagar News: भातगाव-गोळेवाडीत गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Guhagar News: भातगाव-गोळेवाडीत गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात उदघाटन!

गुहागर तालुक्यातील भातगाव – गोळेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या या विसर्जन तलावाच्या उपलब्धतेमुळे संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे जंगी स्वागत

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या सुचिता घाणेकर – गोताड, सरपंच रेणुका आग्रे, विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर आणि अनंत डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांना वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या व बँजो पार्टीच्या गजरात तसेच फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.

फित कापून व श्रीफळ वाढवून अधिकृत उदघाटन

तलावाच्या लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते फित कापून, तर गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विसर्जन तलावाचे अधिकृत उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सभापती महेश नाटेकर, प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे आणि माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या सुविधेमुळे गणेशोत्सवात विसर्जन प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ग्रामस्थ व मानकऱ्यांची मोठी उपस्थिती

या सोहळ्याला भातगाव-गोळेवाडीतील अनंत आग्रे, महादेव आग्रे, अनंत दामोदर आग्रे, मनोहर आग्रे, गोपीनाथ गावडे, गंगाराम आग्रे, शंकर आग्रे, नामदेव आग्रे, शंकर गावडे, अनंत आग्रे, बाळू डिंगणकर, मालू सोलकर, रघुनाथ गावडे, रवींद्र गावडे, लक्ष्मण आग्रे, दिलीप मते, शंकर डिंगणकर, कृष्णा सोलकर, जानू सोलकर, कृष्णा आग्रे, दामोदर आग्रे, माजी सरपंच रवी पवार, संतोष आग्रे, मुरली आग्रे आणि सिद्धोधन मोहिते यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला, पुरुष कार्यकर्ते, गावकरी, मानकरी आणि जागामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अनंत गावडे गुरुजी यांनी मानले.