रत्नागिरीत ‘एस एस मोबाईल’मध्ये आयफोन १८ चे दिमाखदार अनावरण; ऑनलाईनपेक्षाही कमी दरात खरेदीची संधी

रत्नागिरीत 'एस एस मोबाईल'मध्ये आयफोन १८ चे दिमाखदार अनावरण; ऑनलाईनपेक्षाही कमी दरात खरेदीची संधी

नगरसेवक सौरभ मलुष्टे, ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू यांच्या उपस्थितीत लाँचिंग; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स

रत्नागिरी : तंत्रज्ञानप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ॲपल कंपनीच्या बहुप्रतिक्षित ‘आयफोन १८’ (iPhone 18) या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे रत्नागिरी शहरातील नामांकित ‘एस एस मोबाईल’ (SS Mobile) च्या नवकार प्लाझा शाखेत मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्यानंतर आता आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स ही मॉडेल्स रत्नागिरीकरांसाठी विक्रीकरिता उपलब्ध झाली आहेत.

मान्यवरांच्या हस्ते झाले लाँचिंग

मारुती मंदिर परिसरातील नवकार प्लाझा येथील एस एस मोबाईलच्या शाखेत हा अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक सौरभ मलुष्टे, ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, नवलाई ग्रुपचे संचालक धर्मेंद्र सावंत व वेदांत सावंत तसेच एस एस मोबाईलचे संचालक अमोल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन फोनचे अनावरण करण्यात आले.

विश्वासू विक्री व तत्पर सेवेचे केंद्र : एस एस मोबाईल

रत्नागिरी शहरात मोबाईल खरेदीसाठीचे अग्रगण्य आणि विश्वासू दालन म्हणून एस एस मोबाईलची ओळख आहे. नवकार प्लाझा शाखेचे सर्वेसर्वा अमोल डोंगरे यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे एक मोठा ग्राहकवर्ग या दालनाशी जोडला गेला आहे. महागडे स्मार्टफोन खरेदी करताना विक्रीपश्चात (After Sales Service) मिळणारी खात्रीशीर सेवा अत्यंत महत्त्वाची असते, आणि तोच दृढ विश्वास संचालक अमोल डोंगरे यांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळतो. त्यामुळेच रत्नागिरीकर मोठ्या खात्रीने येथे खरेदी करतात.

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्सची वैशिष्ट्ये :

ॲपलने सादर केलेल्या या नव्या सिरीजमध्ये अनेक क्रांतिकारक तंत्रज्ञान देण्यात आले आहे:

शक्तीशाली प्रोसेसर व कार्यक्षमता : हे फोन्स iOS 27 वर चालणार असून यात ॲपलची अत्याधुनिक A20 प्रो चिपसेट, १२ जीबी रॅम आणि नवीन इन-हाउस C2 मॉडेम समाविष्ट आहे. तसेच प्रगत AI वर्कलोड हाताळण्यासाठी अपग्रेड केलेले न्यूरल इंजिन आणि नवीन थर्मल आर्किटेक्चर दिले आहे.

दीर्घकाळ टिकणारी बॅटरी : प्रो मॉडेलमध्ये एका चार्जवर ३६ तासांपर्यंत, तर प्रो मॅक्स मॉडेलमध्ये तब्बल ४५ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक बॅटरी लाईफ मिळते.

क्रांतिकारक कॅमेरा सिस्टीम : मागील बाजूस तिहेरी ४८-मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये ॲपलचा पहिला ‘व्हेरिएबल ॲपर्चर’ (Variable Aperture) कॅमेरा असून, कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटोग्राफी करता येते. समोर १८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा आहे.

फोटो सत्यता पडताळणी : फोटोंची सत्यता आणि मूळ स्रोत पडताळण्यासाठी ‘ॲपल रेफरल इमेज’ हे नवीन सुरक्षा फीचर देण्यात आले आहे.

रंग व डिझाइन : रंगाशी जुळणारे ॲल्युमिनियम साइड रेल्स असून हे फोन बरगंडी, सिल्व्हर आणि ब्लॅक अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदीचे आवाहन

आयफोन १८ हा ऑनलाईनपेक्षाही अत्यंत माफक आणि आकर्षक दरात उपलब्ध करून देण्यात आला असून, ग्राहकांनी खरेदीसाठी आजच ‘एस एस मोबाईल’, नवकार प्लाझा, मारुती मंदिर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संचालक अमोल डोंगरे यांनी केले आहे.