यंदा ‘चलचित्र’ आणि ‘आरास’ असे दोन स्वतंत्र विभाग; पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचे लाभले पाठबळ
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच ‘चलचित्र’ आणि ‘आरास / सजावट’ असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले होते. या स्पर्धेत ‘चलचित्र’ विभागात संदीप चंद्रकांत मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांच्या "श्री स्वामी समर्थांचा दिव्य प्रगटावतार" या देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘आरास / सजावट’ विभागात अनिकेत सूर्यकांत सुपल (सह्याद्रीनगर-नाचणे) यांच्या "बारा ज्योतिर्लिंग" सजावटीने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला, अशी माहिती आयोजक कांचन मालगुंडकर यांनी जाहीर केली आहे.
पालकमंत्री व आमदारांचे पाठबळ; पालिकेचे विशेष सहकार्य
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे उद्योग व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांचे या उपक्रमाला भक्कम पाठबळ लाभले. तसेच यंदा रत्नागिरी नगर परिषदेचेही विशेष सहकार्य लाभले असून नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी स्पर्धेसाठी मोलाची मदत केली.

घरोघरी जाऊन दिवस-रात्र केले काटेकोर परीक्षण
गणपती स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच परीक्षण मोहिमेला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील दुर्गम वाटा तुडवत, दिवस-रात्र एक करत परीक्षकांनी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पारदर्शक व काटेकोर परीक्षण केले. स्पर्धेसाठी कांचन मालगुंडकर, अभिजीत नांदगावकर, नरेंद्र पाटील, विजय पाडावे, मुकुंद विलणकर, विजय बासुतकर, ओंकार पाटणकर, शकील गवाणकर, बाळकृष्ण चव्हाण, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे आणि चंद्रहास विलणकर यांनी परीक्षक म्हणून परिश्रम घेतले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
१) चलचित्र विभाग :
प्रथम क्रमांक : संदीप मेस्त्री, सड्येवाडी-जयगड (श्री स्वामी समर्थांचा दिव्य प्रगटावतार)
द्वितीय क्रमांक : मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर (हिरकणी देखावा)
तृतीय क्रमांक : दीपक मेस्त्री, मिरजोळे (भक्त पुंडलिक)
२) आरास / सजावट विभाग :
प्रथम क्रमांक : अनिकेत सुपल, सह्याद्रीनगर-नाचणे (बारा ज्योतिर्लिंग)
द्वितीय क्रमांक : स्वप्नील ठिक, तिवंडेवाडी-शिरगाव (ग्रामीण घर – वारली पेंटिंग)
तृतीय क्रमांक : अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी (दगडावर चित्रकला)
३) सुबक मूर्तिकार :
वैभव लिंगायत (राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती)
४) विशेष उल्लेखनीय देखावे :
चारुदत्त धालवलकर, गावखडी (संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत)
जीवन कोळवणकर, कुवारबाव (गोकर्ण महाबळेश्वर कथा)
साईराज वाडकर, मिरजोळे (छ. शिवाजी महाराज – भवानी तलवार)
घाटकर परिवार, शेडगेवाडी-पावस (अन्नभेसळ समाजप्रबोधन)
५) उत्तेजनार्थ पारितोषिके :
१) साईराज पोटफोडे, जुनी तांबटआळी (पुरातन मंदिर)
२) निखिल साळवी, गावखडी (सुंभ आरास)
३) आग्रे परिवार, पावस (एकविरा माता मंदिर)
४) संकेत पाटील (रेडिएशन दुष्परिणाम)
६) प्रोत्साहनपर पारितोषिके :
अथर्व सावंत (नाचणे), विशाल शिंदे (सोमेश्वर), किशोर जोशी (मिरजोळे), सागर पुसाळकर (निवखोल), ओंकार कांबळे (भाट्येमिऱ्या), चैतन्य खेडेकर (बंदररोड), दीक्षा रसाळ (वरचीआळी), सुरेश सनगरे (परटवणे), यश आंब्रे (गावडे आंबेरे), आध्या शिर्सेकर (भाट्ये), ओम तोडणकर (कुर्ली), सार्थक मुरकर (फणसोप), महेश सुतार (गावखडी सुतारवाडी).













