Dongartitha Accident News: राजापूर डोंगरतिठा येथे टाटा पंच आणि स्विफ्ट डिझायरची धडक; दोन जण जखमी

Dongartitha Accident News: राजापूर डोंगरतिठा येथे टाटा पंच आणि स्विफ्ट डिझायरची धडक; दोन जण जखमी

जैतापूर-हातिवले मार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याने भीषण अपघात; दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

Dongartitha Accident News प्रकरणी राजापूर तालुक्यातील डोंगरतिठा येथे दोन गाड्यांची जोरदार धडक होऊन दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० च्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी निळकंठ सुभाष थळेश्री (वय ३२, रा. नाटे, थळेश्रीवाडी) यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट डिझायर चालक उमेश राजाराम हिंदळेकर (वय ४५, रा. विक्रोळी, मुंबई) याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाटे ते कणकवली प्रवासादरम्यान घडली घटना

फिर्यादी निळकंठ थळेश्री हे आपली टाटा पंच (एमएच ०८ बीई ०५८५) गाडी घेऊन नाटे ते कणकवली असा प्रवास करत होते. डोंगरतिठा येथे आल्यानंतर सागवे रस्त्यावरून डोंगरच्या दिशेने जाणारी स्विफ्ट डिझायर (एमएच ४६ बीके ३१५७) समोरून आली.

Tata motars tiago

रस्ता ओलांडताना निष्काळजीपणाचा आरोप

जैतापूर-हातिवले या मुख्य मार्गावरील वाहतूक पाहून रस्ता ओलांडताना आवश्यक ती खबरदारी घेणे अपेक्षित होते. मात्र, संशयित चालक हिंदळेकर यांनी आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अचानक रस्त्याच्या मध्यभागी आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही वाहनांची आपसात जोरदार धडक झाली.

अपघातात दोघे जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

या अपघातात टाटा पंचमधील महेश थळेश्री आणि काव्या थळेश्री हे दोघे जखमी झाले आहेत. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.