कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावरील घटना; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई

Ratnagiri Traffic Obstruction Case प्रकरणी कारवांचीवाडी फाटा ते खेडशी जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने दुचाकी उभी केल्याप्रकरणी ६४ वर्षीय व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गंगाराम होरंबे (वय ६४, रा. पानवल, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रस्त्यावर दुचाकी उभी केल्याने अडथळा
१७ सप्टेंबर रोजी सायं. ६.१५ च्या सुमारास संशयित अनंत होरंबे हे कारवांचीवाडी फाटा ते खेडशी रस्त्यावर आपली दुचाकी (एमएच ४३ बीटी ९४०१) घेऊन आले होते. त्यांनी ही दुचाकी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
याप्रकरणी पोलीस हवालदार सागर साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून होरंबे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिकृत नोंद १७ सप्टेंबर रोजी रात्री ७.२७ वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.













