वेरवली बुद्रुक-डोळसवाडी येथील काजूच्या झाडाखाली छापा; ४.५ लिटर गावठी दारूसह मुद्देमाल जप्त
Lanja Illegal Liquor Case प्रकरणी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक-डोळसवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती जितेंद्र डोळस (वय ४२, रा. वेरवली डोळसवाडी, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
काजूच्या झाडाखाली सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१७ सप्टेंबर) सायं. ७.४५ च्या सुमारास डोळसवाडी येथील एका काजूच्या झाडाखाली संशयित तृप्ती डोळस ही विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून तिला ताब्यात घेतले.

मुद्देमाल जप्त; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
कारवाईदरम्यान तिच्यकडून पांढऱ्या रंगाच्या पाच लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये असलेली ४.५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. कॅनसह जप्त केलेल्या या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५३० रुपये इतकी आहे. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.













