खेडमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; निष्काळजीपणाप्रकरणी दोघांवर गुन्हा

खेडमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; निष्काळजीपणाप्रकरणी दोघांवर गुन्हा

भरणे येथील सनसिटी इमारतीच्या बांधकामावर सुरक्षेची उपाययोजना नसल्याने अपघात; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

खेड, रत्नागिरी:

तालुक्यातील भरणे येथील ‘सनसिटी’ इमारतीमध्ये सुरक्षेच्या उपायांचा अभाव एका मजुराच्या जीवावर बेतला आहे. बांधकामाच्या पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने परप्रांतीय मजुराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी कोणतीही सेफ्टी नेट (सुरक्षा जाळी) किंवा सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास घडली.

Rotery school

पाचव्या मजल्यावरून थेट पोडियम पार्किंगमध्ये कोसळला मजूर

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मजुराचे नाव इजहारअली हदिसमियों मन्सुरी (वय २९, मूळ रा. संतपूर, राज्य बिहार) असे आहे. भरणे येथील सनसिटी बिल्डिंगच्या सी-विंग इमारतीमध्ये सध्या सेंट्रिंगचे काम वेगाने सुरू आहे. घटनेच्या दिवशी इजहारअली हा पाचव्या मजल्यावर सेंट्रिंगच्या कामासाठी लाकडी फळी देण्याचे काम करत होता. या दरम्यान अचानक त्याचा हात सुटल्याने तोल गेला आणि तो थेट पोडियम पार्किंगच्या स्लॅबवर खाली कोसळला.

सुरक्षेअभावी निष्काळजीपणा; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

या भीषण अपघातात इजहारअली याच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि छातीला गंभीर स्वरूपाचा मुकामार लागला होता. त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेनंतर मोहम्मदनसीम राजा मन्सुरी यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेली ‘सेफ्टी नेट’ न लावता कामावर मोठा निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गौरव वाल्मिक लांडगे (रा. वेरळ, ता. खेड) आणि सुशांत भगवान तांबे (रा. शिरवली, बौद्धवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.