Konkan Railway Special: चाकरमान्यांच्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्याने २ विशेष गाड्या धावणार

Konkan Railway Special: चाकरमान्यांच्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्याने २ विशेष गाड्या धावणार

२६ व २७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त फेऱ्या; मध्य रेल्वेच्या सहकार्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय

रत्नागिरी:

गणेशोत्सव काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड या मार्गावर दोन जादा विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Rotery school

विशेष ट्रेनचे वेळापत्रक आणि मार्ग

cake of the day

कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०१००९ मुंबई CSMT – सावंतवाडी रोड स्पेशल २६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई सीएसएमटीवरून दुपारी १३:४५ (१:४५) वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोड – मुंबई CSMT स्पेशल २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोड स्थानकावरून पहाटे ४:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१५ (६:१५) वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

२३ प्रमुख स्थानकांवर थांबणार गाडी; २२ डब्यांची रचना

प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष ट्रेनला मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांब्याची सुविधा देण्यात आली आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबणार आहे.

एकूण २२ डब्यांच्या या ट्रेनमध्ये ३-टायर एसी चे २ कोच, स्लीपर क्लासचे १२ कोच, जनरल क्लासचे ६ कोच आणि २ एसएलआर/डी डब्यांचा समावेश असणार आहे.