Ratnagiri Crime News: भाट्ये मुरकरवाडी स्टॉपजवळ अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Ratnagiri Crime News: भाट्ये मुरकरवाडी स्टॉपजवळ अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शहर पोलिसांच्या रात्रगस्तीदरम्यान कारवाई; संशयितावर एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा नोंद

रत्नागिरी:
रत्नागिरीतील भाट्ये येथील मुरकरवाडी स्टॉपजवळ अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१८ सप्टेंबर) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या गस्तीदरम्यान करण्यात आली.

स्ट्रीट लाईटखाली अमली पदार्थाचे सेवन करताना पकडले

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मर्जान अब्दुल्ला तांडेल (वय ३०, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शहर परिसरात रात्रगस्त घालत होते. या दरम्यान भाट्ये येथील मुरकरवाडी स्टॉपजवळ असलेल्या स्ट्रीट लाईटखाली संशयित तरुण अमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना आढळून आला.

एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार कारवाई आणि तपास सुरू

पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित मर्जान तांडेल याच्याविरोधात एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क) आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ सेवनाविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून या प्रकरणाचा पुढील अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.