नगरसेवक विजय खेडेकर व नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी घेतले शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरच्या गणरायाचे दर्शन

नगरसेवक विजय खेडेकर व नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी घेतले शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरच्या गणरायाचे दर्शन

प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी साधला आपुलकीचा संवाद; दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणामध्ये शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विजय खेडेकर आणि शिवसेना महिला शहर संघटक तथा प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांनी रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

नागरिकांशी थेट संवाद आणि सदिच्छा भेट :
या दौऱ्यादरम्यान खेडेकर दांपत्याने विविध मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांच्याशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. बाप्पाच्या चरणी लीन होऊन त्यांनी शहरवासीयांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला दौरा :
गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर दरवर्षीप्रमाणे नागरिकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्याची आणि थेट जनतेशी ऋणानुबंध जपण्याची ही परंपरा यंदाही अत्यंत उत्साही, आनंदी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या भेटीबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त करत त्यांचे स्वागत केले.

Amey jwelrs