रत्नागिरीत ‘गद्रे मरीन एक्सपोर्ट’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; थेट मुलाखतींचे आयोजन

रत्नागिरीत ‘गद्रे मरीन एक्सपोर्ट’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; थेट मुलाखतींचे आयोजन

ट्रेनी वर्कर, फिटर आणि इलेक्ट्रिशियन पदांच्या जागा; आकर्षक सुविधांसह मोफत बस प्रवासाची सोय

रत्नागिरी : रत्नागिरीतील नामांकित ‘गद्रे ग्रुप ऑफ कंपनीज’च्या विविध प्रकल्पांमध्ये रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गद्रे मरीन एक्सपोर्टच्या मिरकरवाडा व मिरजोळे एमआयडीसी येथील प्लांट्समध्ये ट्रेनी (वर्कर) तसेच सोलारस्केप इंटरप्रायझेस लिमिटेडमध्ये फिटर व इलेक्ट्रिशियन या पदांसाठी इच्छुक युवक-युवतींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:३० या वेळेत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गद्रे मरीन एक्सपोर्ट, मिरकरवाडा प्लांट (ट्रेनी वर्कर) :

मिरकरवाडा येथील प्लांटमध्ये ट्रेनी (वर्कर) पदासाठी मुला-मुलींची भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. उमेदवार किमान १० वी पास किंवा नापास असावा तसेच शिफ्ट ड्युटीमध्ये काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ESIC, फॅमिली इन्शुरन्स, PF आणि ग्रॅच्युइटी यांसारख्या सुविधा दिल्या जातील. मुलाखतीचे स्थळ: गद्रे मरीन एक्सपोर्ट, मिरकरवाडा, रत्नागिरी.

Physciobot

सोलारस्केप इंटरप्रायझेस लि., मिरजोळे एमआयडीसी (फिटर व इलेक्ट्रिशियन) :

गद्रे ग्रुप ऑफ कंपनीजच्या मिरजोळे एमआयडीसी येथील ‘सोलारस्केप इंटरप्रायझेस लि.’ या कंपनीत फिटर आणि इलेक्ट्रिशियन ही तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण आणि अप्रेंटिसशिप पूर्ण केलेला असावा. या पदांसाठीही ESIC, फॅमिली इन्शुरन्स, PF व ग्रॅच्युइटीचे सर्व लाभ मिळतील. मुलाखतीचे स्थळ: गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., एम.आय.डी.सी., मिरजोळे, रत्नागिरी.

गद्रे मरीन एक्सपोर्ट, क्रॅब स्टिक प्लांट, मिरजोळे (ट्रेनी वर्कर) :

मिरजोळे एमआयडीसीतील क्रॅब स्टिक प्लांटमध्येही ट्रेनी (वर्कर) पदासाठी मुला-मुलींची पदे भरली जाणार आहेत. यासाठी वय १८ ते ३५ वर्षे आणि किमान १० वी पास किंवा नापास असणे अनिवार्य आहे. येथे निवड होणाऱ्या उमेदवारांना ESIC, PF, फॅमिली इन्शुरन्स आणि ग्रॅच्युइटीसोबतच महिला व तरुणींसाठी मोफत बस प्रवासाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाखतीचे स्थळ: गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., एम.आय.डी.सी., मिरजोळे, रत्नागिरी.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे व संपर्क :

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (LC), आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ९६०७९८२८११ किंवा ९१६८६८८२१३ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.