Ozone Ghantagadi Kelavali Rajapur: ओझोन घंटागाडी ग्रा.पं. कार्यालय आवारात धूळ खात; केळवली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संताप

नागरी सुविधांकडे दुर्लक्ष आणि ओढ्यांमध्ये कचरा; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर:
Ozone Ghantagadi Kelavali Rajapur प्रकरणी जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदानातून लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली ओझोन घंटागाडी गेल्या ३ वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालय आवारात धूळखात उभी आहे. त्यामुळे केळवली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे घंटागाडी वापराविना पडून असताना ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून कचरा अद्यापही रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Ozone Ghantagadi Kelavali Rajapur वापराविना; कचऱ्यामुळे अस्वच्छता
केळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वच्छतेसाठी घंटागाडीचा वापर अपेक्षित असताना, या वाहनाचा गेल्या ३ वर्षांत कोणताही प्रभावी वापर झालेला नाही. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या वाहनाचा नेमका उपयोग कशासाठी झाला, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत परिसरातील काही कोंबडी व्यावसायिकांकडून व्यवसायातून निर्माण होणारी घाण परिसरातील ओढ्यांमध्ये टाकली जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भटक्या कुत्र्यांचा वावर अन् तातडीने बंदोबस्ताची मागणी
ओढ्यांमध्ये कचरा व घाण साचल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही कुत्री रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, घंटागाडीचा वापर तातडीने सुरू करावा आणि ओढ्यांमधील घाणीची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 30-09-2026

Ratnagiri Khabardar add image