Khed House Break-ins: खेड तालुक्यात दोन घरफोड्यांत ७.८२ लाखांहून अधिक ऐवज लंपास; गुन्हे दाखल

Khed House Break-ins: खेड तालुक्यात दोन घरफोड्यांत ७.८२ लाखांहून अधिक ऐवज लंपास; गुन्हे दाखल

आंबडस खोतवाडी आणि शिव बुद्रुक मोहल्ला येथे कुलूप व कोयंडे तोडून चोरी; दागिने, रोकड व इतर साहित्य लांबवले

खेड: Khed House Break-ins च्या सलग घटनांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खळबळ उडाली असून, आंबडस खोतवाडी आणि शिव बुद्रुक मोहल्ला येथे झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी एकूण सात लाख ८२ हजार २५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दोन्ही घटनांमध्ये घरांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कोयंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आंबडस खोतवाडी येथील घरफोडीचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे अशोक रघुनाथ जाधव (वय ५८) यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजल्यापासून २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी घडली. चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या चोरीत सोन्याचा लक्ष्मीहार, डिझाईनदार नेकलेस, पिळ्याची चेन, कर्णफुले, कानपट्टी वेल, नक्षीदार रिंग, बदामपान, सोन्याची अंगठी, वाघनखं तसेच चांदीचा कमरेचा छल्ला आणि चांदीची अंगठी या दागिन्यांचा समावेश आहे.

शिव बुद्रुक मोहल्ला येथील चोरीची घटना
दुसऱ्या घटनेत शिव बुद्रुक मोहल्ला परिसरात अहमद महम्मद परकार (वय ५६) यांच्या मावस भावाच्या आणि शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून चोरट्यांनी सोन्याच्या दोन चेन, प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या कानातील तीन जोड पळ्या आणि पाच हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.

Shanti 3

एकूण ७.८२ लाखांचा मुद्देमाल चोरीला
दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या, गॅस सिलिंडर आणि धातूची भांडी असा मिळून ७ लाख ८२ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. खेड तालुक्यातील या घरफोड्यांचा खेड पोलिस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.