Devendra Fadnavis PC Mumbai: लोकशाही संस्था कुचकामी दाखवण्याचा कट; राहुल गांधींच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

MPSC विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण; एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Devendra Fadnavis PC Mumbai: “भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी आहेत, हे लोकांच्या मनात रुजवण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर ते सांगतील की संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, म्हणून संविधान हातात घेऊन हे काम सुरु आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधींच्या आंदोलनावर जोरदार भाष्य केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Devendra Fadnavis PC Mumbai: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण; अध्यक्षांच्या चौकशीचे आदेश

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या (MPSC) आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून त्यांनी माझं अभिनंदनही केलं आहे. मात्र, स्वतःच्या लीडरशिपसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी या विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. भारतातील सगळ्या लोकशाही संस्था संपवा, अशा टोकाच्या पातळीवर जाऊन विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे.”

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “MPSC च्या अध्यक्षांना हटवणे किंवा त्यांचा राजीनामा घेणे हे थेट राज्य सरकारच्या हातात नसते. संविधानातील कलम ३१७ (Article 317) नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) शिफारसीवरूनच त्यांना हटवता येते. विद्यमान अध्यक्ष हे पेपर फुटला त्या काळात अध्यक्ष नव्हते, तरीही विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही आयोगाच्या आजी-माजी अध्यक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाईल. कालच राज्य सरकारतर्फे राज्यपाल महोदयांकडे याबाबत विनंती करण्यात आली आहे.”

राज्यातील दुष्काळ परिस्थिती व केंद्राची समिती

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरले आहे. राज्यातील सुमारे २३ हजार गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या ११ तारखेला केंद्राची एक विशेष समिती राज्याच्या दौऱ्यावर येणार असून, केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.”

Tata sierra

‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “गोकुळची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. सध्या या निवडणुकीचे नेतृत्व हसन मुश्रीफ करत असून, त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल. माझ्या पातळीवर यावर कोणताच वेगळा निर्णय होणार नाही.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 06-10-2026