INS Surya Launch News: ‘INS सूर्य’ लॉन्च! भारतीय नौदलाच्या सागरी शक्तीत मोठी वाढ

विशाखापट्टणमच्या हिंदुस्तान शिपयार्ड येथे पहिली स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप FSS-1 ‘INS सूर्य’चे जलावतरण; ३०० टन गोलियथ क्रेनचेही उद्घाटन

INS Surya Launch News: देशाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या आणि स्वदेशी जहाज निर्मिती क्षमतेला गती देण्याच्या दृष्टीने आज, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) मध्ये अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी भारतीय नौदलाची पहिली पूर्णपणे स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप FSS-1 अर्थात ‘आयएनएस सूर्य’ (INS Surya) चे भव्य जलावतरण (लॉन्च) केले.

याशिवाय, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते अपग्रेडेड स्लिपवे-४ आणि ३०० टन क्षमतेच्या अत्याधुनिक गोलियथ क्रेनचेही उद्घाटन करण्यात आले.

INS Surya Launch News: ‘आयएनएस सूर्य’ची वैशिष्ट्ये अन् नौदलासाठी महत्त्व

हिंद महासागर क्षेत्रात (Indian Ocean Region) भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना दीर्घकाळ मोहिमांवर राहण्यासाठी इंधन, रसद, देखभाल आणि अखंड सहाय्याची गरज असते. ‘आयएनएस सूर्य’ या फ्लीट सपोर्ट जहाजामुळे नौदलाची सहनशक्ती, पोहोच आणि काम करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

  • पूर्णपणे स्वदेशी डिझाइन: हे जहाज संपूर्णपणे भारतात डिझाइन आणि तयार करण्यात आले आहे.
  • अत्याधुनिक सुविधा: या जहाजात मोठा कार्गो आणि इंधन साठा, ऑनबोर्ड देखभाल वर्कशॉप, मल्टी-रोल हेलिकॉप्टरसाठी विशेष डेक आणि स्वसंरक्षण प्रणाली (Self-Defence System) समाविष्ट आहे.
  • मोहिमांना गती: हे जहाज समुद्राच्या मध्यभागीच इतर युद्धनौकांना इंधन पुरवठा, अन्नधान्य, दारूगोळा व रसद पोहोचवून नौदलाच्या मोहिमा प्रदीर्घ काळ अखंडित ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.

आत्मनिर्मरता अन् जागतिक स्पर्धा हेच पुढचे पाऊल: राजनाथ सिंह

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये विशाखापट्टणम येथेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या ‘उषा’ जहाजाची निर्मिती झाली होती, या ऐतिहासिक भूमीला आठ दशकांचा सागरी वारसा आहे. आजच्या काळात ‘आत्मनिर्भरता’ सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि जागतिक स्पर्धा हे त्यापुढचे पाऊल आहे. भारतीय शिपयार्ड्सनी गुणवत्ता, तंत्रज्ञान, वेळेत डिलिव्हरी आणि विश्वासार्हतेच्या जोरावर जागतिक स्तरावरील आघाडीच्या शिपयार्ड्सशी स्पर्धा केली पाहिजे.”

Tata sierra

ते पुढे म्हणाले, “केवळ एकटे नौदल किंवा केवळ एक शिपयार्ड भारताची सागरी ताकद वाढवू शकत नाही. विशाखापट्टणमला देशाचे प्रमुख सागरी औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नौसेना, शिपयार्ड्स, DRDO, खाजगी उद्योग, MSME आणि नवोदित स्टार्टअप्सनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. उत्तम डिझाइन बनवा, वेगाने काम करा, वेळेत डिलिव्हरी द्या आणि योग्य देखभाल करा, हाच आपला मंत्र असायला हवा.”

गेल्या एका दशकात देशातील संरक्षण निर्मिती क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल झाला असून, देशांतर्गत डिझाइन आणि निर्मितीवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:04 06-10-2026