सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ आत्मचरित्राच्या निमित्ताने झालेल्या संवादात राजीव गांधी यांच्या हत्येबाबत मोठे विधान
नवी दिल्ली: Rahul Gandhi Claim मुळे देशाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या व्हावी, याच उद्देशाने त्यांची सुरक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक काढण्यात आली होती, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्राच्या निमित्ताने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी झालेल्या विशेष संवादादरम्यान राहुल गांधी यांनी हे भाष्य केले. राजीव गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेतील बदलांबाबत त्यांनी या संवादात आपली भूमिका मांडली.














