GMC Ratnagiri 24th Cadaver Organ Donation: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान!

काळबादेवीच्या दिवंगत तुकाराम बनप यांच्या पूर्वइच्छेनुसार देह सुपूर्द

रत्नागिरी: GMC Ratnagiri 24th Cadaver Organ Donation Tukaram Banap च्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) २४ वे मरणोत्तर देहदान पार पडले आहे. काळबादेवी (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ नागरिक दिवंगत तुकाराम शंकर बनप (वय ८३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पूर्वइच्छेनुसार आणि कुटुंबीयांच्या सकारात्मक निर्णयामुळे त्यांचा देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.

GMC Ratnagiri 24th Cadaver Organ Donation Tukaram Banap: पूर्वइच्छेचा आदर करत कुटुंबीयांनी पूर्ण केले देहदान

दिवंगत तुकाराम बनप यांनी २९ जानेवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र सादर केले होते. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी कोणताही विलंब न लावता त्यांच्या उदात्त विचारांचा आदर राखत ६ ऑक्टोबर २०२६ रोजी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणीचे माजी मुख्य लिपिक अन् सामाजिक कार्यकर्ते

तुकाराम बनप यांनी जी. एम. शेट्ये हायस्कूल, बसणी येथे मुख्य लिपिक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. काळबादेवी गावात सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आपल्या वाडीतील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवत त्यांनी समाजकार्य केले. जगाचा निरोप घेतानाही त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी देहदान करून परोपकाराचा आदर्श घालून दिला, अशी भावना काळबादेवीतील ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक मयेकर यांनी व्यक्त केली.

नात डॉक्टर; आजोबांच्या देहदानाने जोडले गेले वैद्यकीय क्षेत्राशी अनोखे नाते

विशेष म्हणजे, त्यांची नात कु. पायल मिलिंद बनप हिने नुकतीच बीएचएमएस (BHMS) अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. नात वैद्यकीय पदवीधर झालेली असतानाच आजोबांनी वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केल्यामुळे बनप कुटुंबीयांचे वैद्यकीय क्षेत्राशी एक अत्यंत प्रेरणादायी आणि अनोखे ऋणानुबंध जोडले गेले आहेत.

Tata SUV

ग्रामस्थ आणि वैद्यकीय पथकाचा सहभाग

या वेळी बनप यांचे सुपुत्र मिलिंद, प्रीतम व प्रशांत बनप, सुना, नातवंडे आणि आप्तस्वकीय उपस्थित होते. तसेच बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव बापू गवाणकर, सदस्य संजय वारेकर, मारुती मयेकर, काळबादेवीतील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मयेकर, रवी सुर्वे, जयवंत मयेकर, बंड्या पेटकर, विनय मयेकर, विवेक मयेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी कै. बनप यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

देहदानाची प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहन चालक प्रीतम भोसले यांनी पूर्ण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 08-10-2026