Anjanari Bridge Accident News: अंजणारी पुलावर दोन कंटेनरची भीषण धडक; चालक किरकोळ जखमी

लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीव्र वळणाच्या उचारावर नियंत्रण सुटल्याने अपघात; महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत

Anjanari Bridge Accident News अंतर्गत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावरील तीव्र वळणाच्या उचारावर दोन कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या अपघातात एक कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक जावेद मलिक (रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश) हे कंटेनर क्रमांक (HR 84 Y 4562) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजणारी पुलावरील तीव्र वळणाच्या उचारावर अचानक त्यांच्या ताब्यातील कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि पुढे जात असलेल्या (MH 46 DL 7111) क्रमांकाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या धडकेत चालक जावेद मलिक हे किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या रुग्णवाहिकेतून जखमी चालकाला पुढील उपचारासाठी पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी कळताच हातखंबा येथील महामार्ग पोलीस आणि लांजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.

रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आले असून, अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी लांजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित असून, या अपघाताप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 09-10-2026