Delhi CJP Protest: जंतरमंतर आणि कनॉट प्लेस परिसरात तणावपूर्ण वातावरण; रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड; १५० हून अधिक जण ताब्यात

दिल्लीत ३८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात, २५० ट्रेन्स आणि ४५ मेट्रो स्थानके बंद; आंदोलकांवर ड्रोनद्वारे नजर

दिल्ली:

Delhi CJP Protest Video च्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआरच्या निलंबनाची मागणी करत ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थकांनी दिल्लीतील जंतरमंतर आणि कनॉट प्लेस येथे जमण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १५० जणांना ताब्यात घेतले असून, आंदोलकांना हटवताना अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्याचे दिसून आले आहे.

दिल्लीत कठोर सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक निर्बंध

  • दिल्लीमध्ये बीएसएफच्या जवानांसह ३८ हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
  • नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या २५० मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सुरक्षेचा उपाय म्हणून ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली असून १० नजरकैद केंद्रे उभारण्यात आली आहेत.
  • इंडिया गेटच्या ४ किलोमीटर परिसरातील इंटरनेट सेवा शुक्रवार रात्री १० ते शनिवार रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे.
  • शेतकरी आंदोलनाप्रमाणेच दिल्लीच्या सीमांवर सिमेंटचे बॅनिकेट्स आणि रस्त्यावर खिळे पसरवण्यात आले आहेत.

नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि विविध भागातील स्थिती

  • अभिजीत दीपके यांचा सरकारवर उपरोध: सरकार तरुणांना इतके का घाबरते? रेल्वे, मेट्रो आणि इंटरनेट बंद करण्याची काय गरज होती, असा सवाल करत त्यांनी जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागातून लष्कर व सीआरपीएफला बोलावून दिल्लीत तैनात केल्याबद्दल टीका केली.
  • दिल्ली-नोएडा सीमा: येथे वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असली तरी सुरक्षा व्यवस्था अत्यंत सतर्क असून अनेक ठिकाणी बीएनएसएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
  • ड्रोनद्वारे पाळत: जंतरमंतरसह संवेदनशील भागांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कडक नजर ठेवली जात आहे.
  • सौरव दास यांचे विधान: हा देश आणि लोकशाही परत मिळवण्याचा तसेच ‘जनरेशन-झेड’च्या भविष्यासाठीचा लढा असून, जोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे सौरव दास यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 10-10-2026

Aayurzil