Gunratna Sadavarte on MPSC Protest: भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; एमएससी आंदोलनावर ॲड. गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप

Gunratna Sadavarte on MPSC Protest: भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; एमएससी आंदोलनावर ॲड. गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप

रोहित पवारांवर कडक टीका; विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याचा दावा

Gunratna Sadavarte on MPSC Protest: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर आणि सरकारने चौकशी समितीची नेमणूक केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. या आंदोलनावर भाष्य करताना ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची चौकशी IAS अधिकारी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत, असे सदावर्ते यांनी स्पष्ट म्हटले आहे.

"भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत"
पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले की, "भीमनवार यांच्या विरोधात IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे सचिव म्हणून एखाद्या आयोगाच्या अध्यक्षांविरोधाच्या चौकशीत असू शकत नाहीत आणि त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती देखील भीमनवार यांची चौकशी करू शकत नाहीत." लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची चौकशी विद्यमान समिती करू शकत नाही, असे कायदेशीर मुद्दे मांडत त्यांनी या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवारांवर आणि आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
आंदोलनाच्या राजकारणावर ताशेरे ओढताना सदावर्ते म्हणाले की, "महाराष्ट्रमध्ये संविधान असताना MPSC विद्यार्थ्यांची फसवणूक एका पब्लिक सर्व्हंट असलेल्या व्यक्तीने (रोहित पवार) केली आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा आणि शांततेच्या जागेवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण वाढवण्याचा प्रयत्न झाला."

Tata punch

पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, "जेवण दिलेले काढून घेतले, मग उपकाराची भाषा कशाला? या आंदोलनातून थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आले. ज्या कालखंडात भीमनवार पदावर नव्हते, त्या व्यक्तीच्या अपमानासाठी कशी काय मागणी करू शकता?" तसेच, "रोहितच्या आजोबांच्या काळात लोकसेवा आयोगामध्ये घोटाळे झाले आहेत, आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून ही पवारांची खासियत आहे," असा घणाघातही त्यांनी केला.

भटक्या विमुक्त जातीच्या व्यक्तीला (नवनाथ बन्सार) देखील टार्गेट करण्यात आले, ज्याचा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असा इशाराही सदावर्तेंनी दिला.