चिपळूण, खेड व रत्नागिरी विभागातील ग्राहकांकरिता शनिवारी (दि.२८) रोजी लोकअदालत
रत्नागिरी : वीज ग्राहकांविरोधात थकीत वीजबिल, वीज चोरी आदी कारणांनी महावितरणमार्फत कोर्टात दाखल झालेल्या व होऊ शकणाऱ्या केसेस सन्मानाने व सामोपचाराने सोडवण्याची संधी वीज ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध न्यायालयांत लोकअदालतचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ४४७६ वीज ग्राहकांना या लोकअदालत मध्ये सहभागी होण्याचे आवाहन महावितरण करत आहे.
थकीत वीजबिल, वीज चोरी आदी कारणाने वीज ग्राहकांनी महावितरणला मुळ मुद्दल व दंड भरणे हे वीज अधिनियम २००३ नुसार गरजेचे आहे. मात्र जे ग्राहक ही रक्कम जमा करत नाहीत त्यांच्यावर महावितरणकडून कायदेशीर कारवाई केली जाते. सध्या जिल्ह्यात अशा ४४७६ वीज ग्राहकांकडून थकीत वीज बिल, वीज चोरी व त्यावरील दंड पडकून सुमारे ०३ कोटी ६३ लाख रु. इतक्या कायदेशीर देय रक्कमेचा भरणा अपेक्षित आहे. यामध्ये महावितरणच्या चिपळूण विभागातील ९६१ ग्राहकांकडून ५० लाख, खेड विभागातील ६२२ ग्राहकांकडून ७४ लाख तर रत्नागिरी विभागातील २८९३ ग्राहकांकडून ०२ कोटी ३९ लाख या रकमेचा समावेश होतो.
वरील सर्व सबंधित ग्राहकांना महावितरणकडून लोकअदालत बाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. सदर वीज ग्राहकांनी त्यांच्या केस संदर्भातील सबंधित कोर्टात शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 25/Sep/2024