Higher Education Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त भागातील २.४० लाख विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ; ‘झिरो चलन’ सुविधेमुळे मोठा दिलासा

Higher Education Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त भागातील २.४० लाख विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ; 'झिरो चलन' सुविधेमुळे मोठा दिलासा

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यास ते परत करण्याची प्रक्रिया सुरू

Higher Education Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा शुल्कमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत राज्यातील तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क न भरता ‘झिरो चलन’ (Zero Challan) सुविधेच्या माध्यमातून आपले परीक्षा अर्ज यशस्वीपणे दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

‘झिरो चलन’ सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर
विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ हा विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे पात्र विद्यार्थ्यांना एकही रुपया न भरता परीक्षा अर्ज सादर करणे शक्य झाले आहे. तसेच, यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा शुल्क भरले होते, अशा विद्यार्थ्यांचे भरलेले शुल्क नियमानुसार परत करण्याची (Refund) प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील एकही पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचिथ राहू नये, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी आणि मदत कक्ष
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीबाबत किंवा अर्जासंदर्भात कोणतीही शैक्षणिक अडचण किंवा तांत्रिक अडचणी आल्यास, त्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ किंवा जनसंपर्क अधिकारी/विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमुख विद्यापीठांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

Infigo eyecare

मुंबई विद्यापीठ, मुंबई: डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे: डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), अजय ठुबे (७५८८१६९१३४).

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर: डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव: डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), महाले (९८२३१९२८३१).

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक: डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).