Devendra Fadnavis on Gen Z and Gen Alpha: “माहितीचा स्फोट झालाय, पण ज्ञानाची गरज”; नागपुरातील प्राचार्यांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis on Gen Z and Gen Alpha: "माहितीचा स्फोट झालाय, पण ज्ञानाची गरज"; नागपुरातील प्राचार्यांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Gen Z आणि Gen Alpha पिढ्यांसमोर माहितीचे आव्हान; शिक्षकांची जबाबदारी वाढल्याचे वक्तव्य

Devendra Fadnavis on Gen Z and Gen Alpha: नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आणि ‘जनरेशन अल्फा’ (Gen Alpha) या नव्या पिढ्यांवर, त्यांच्यापुढील आव्हानांवर आणि बदलत्या शिक्षण पद्धतीवर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. "सध्याच्या नव्या पिढ्या माहितीच्या स्फोटाच्या युगात जन्मल्या आहेत. त्यांच्याकडे माहितीचा मोठा साठा आहे, मात्र या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याची खरी गरज आहे," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

"मला गब्बर सिंग न म्हणता ठाकूर संबोधल्याने बरे झाले"
भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काही हलके-फुलके क्षण निर्माण केले. परिषदेच्या सुरुवातीलाच उपस्थितांचे आभार मानल्यामुळे, "आपण मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहोत की नाही, असा प्रश्न मला पडला होता; पण माझे भाषण झाल्याने चिंता मिटली," असे ते म्हणाले. आयोजक देवेन दस्तुरे यांनी परिचय करून देताना ‘शोले’ चित्रपटातील प्रसंगाचा संदर्भ दिला होता. त्यावर भाष्य करताना, "देवेन दस्तुरे यांनी मला ‘शोले’मधील गब्बर सिंग न म्हणता ठाकूर संबोधल्याने बरे झाले," अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी करताच सभागृहात हशा पिकला.

माहिती आणि ज्ञानामधील फरक; शिक्षकांची वाढती जबाबदारी
सध्याच्या डिजिटल युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, Gen Z आणि Gen Alpha या पिढ्या ‘इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन’ (माहितीचा स्फोट) आणि ‘तंत्रज्ञानाच्या एक्सप्लोजन’च्या काळात जन्मल्या आहेत. आजच्या तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते. परंतु, केवळ माहिती असणे म्हणजे ज्ञान असणे नव्हे.

Shoping fest Khabardar

त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षकांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या या प्रचंड माहितीचा वापर करून त्या माहितीचे योग्य आणि उपयुक्त ज्ञानात रूपांतर कसे करता येईल, यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले.