Bengal Bay Cyclone Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज; आंध्र-ओडिशा किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

Bengal Bay Cyclone Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज; आंध्र-ओडिशा किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

२७ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन

Bengal Bay Cyclone Alert: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि लगतच्या दक्षिण-पूर्व भागात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार झाले आहे. हे वादळ आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून किनारपट्टीच्या भागांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

डिप्रेशन ते तीव्र चक्रीवादळाचा धोका
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी सकाळी ५:३० वाजता हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, शनिवारी या सिस्टीमचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे. त्यानंतर हे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकून रविवारी त्याचे ‘डीप डिप्रेशन’मध्ये (Deep Depression) रूपांतर होईल आणि सोमवारी सकाळपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर त्याचे तीव्र चक्रीवादळात (Cyclonic Storm) रूपांतर होण्याचा अंदाज आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

प्रशासन सतर्क आणि नागरिकांना आवाहन
आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (APSDMA) व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, आधीच समुद्रात गेलेल्या सर्व मच्छीमारांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

Shanti real estate 1

‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
IMD अमरावती केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी २७ ऑक्टोबरपासून आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. विशेषतः २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान अल्लूरी सीताराम राजू (ASR), काकीनाडा, पूर्व गोदावरी, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा, एलुरु, पश्चिम गोदावरी आणि NTR जिल्ह्यांसह यनम भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.