Ratnagiri Adult Literacy Exam: केंद्र व राज्य शिक्षण अधिकाऱ्यांकडून झरेवाडी शाळेतील ‘पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी’ची पाहणी

Ratnagiri Adult Literacy Exam: केंद्र व राज्य शिक्षण अधिकाऱ्यांकडून झरेवाडी शाळेतील 'पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी'ची पाहणी

शिक्षण मंत्रालयाचे अवर सचिव राम निवास व शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांची भेट; प्रौढ शिक्षणाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

रत्नागिरी : Ratnagiri Adult Literacy Exam संदर्भात प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत नवसाक्षरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’च्या (FLNAT) कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, झरेवाडी (ता. जि. रत्नागिरी) या परीक्षा केंद्रास भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील प्रौढ शिक्षण विभागाचे अवर सचिव मा. श्री. राम निवास, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय (योजना), पुणे येथील शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, संबंधित उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांनी केंद्रावरील परीक्षा आयोजन, परीक्षार्थींची उपस्थिती, परीक्षा प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शाळा स्तरावर उपलब्ध भौतिक सुविधांची बारकाईने पाहणी केली. परीक्षा नियोजनबद्ध, सुरळीत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याबाबत त्यांनी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच परीक्षार्थी नवसाक्षरांना परीक्षा केंद्रावर सर्व आवश्यक सोयी-सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Kohinoor furni.

नवसाक्षरांच्या मूल्यमापनासाठी विशेष उपक्रम
प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत नवसाक्षर झालेल्या व्यक्तींना मूलभूत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील वाचन, लेखन व पायाभूत संख्याज्ञान (FLNAT) कौशल्यांचे अचूक मूल्यमापन करणे, हा या विशेष चाचणीचा मुख्य उद्देश आहे.

प्रौढ शिक्षणाची ही सामाजिक उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य करण्यासाठी शासन, प्रशासकीय शैक्षणिक यंत्रणा आणि क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय असणे अत्यंत आवश्यक असल्याचे या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. झरेवाडी केंद्रशाळेतील या उच्चस्तरीय भेटीमुळे जिल्ह्यातील परीक्षा प्रक्रियेला अधिक गती मिळण्यासोबतच प्रौढ साक्षरता उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीस मोठी मदत झाली आहे.