Cricket Coaching Camp: कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीतर्फे रत्नागिरीत मुला-मुलींसाठी हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर; १ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

Cricket Coaching Camp: कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीतर्फे रत्नागिरीत मुला-मुलींसाठी हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर; १ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूच्या मैदानावर १ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजन

रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तम व दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत या उद्देशाने रत्नागिरी येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीतर्फे शालेय मुला-मुलींसाठी Cricket Coaching Camp (हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर) चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूच्या मैदानावर पार पडणार आहे. सर्व वयोगटातील तसेच विशेषतः ६ ते १२ आणि १३ ते १९ वयोगटातील मुला-मुलींसाठी हे शिबिर रोज सकाळी व संध्याकाळ अशा दोन सत्रांत चालणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक करणार मार्गदर्शन

या प्रशिक्षण शिबिरात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक श्री. बाबा चव्हाण, श्री. हरीष लाडे, श्री. दिवाकर मयेकर, श्री. अक्षय पाटील, श्री. महेंद्र सुर्वे, श्री. विनोद गावखडकर आणि कु. दर्शना पवार मार्गदर्शन करणार आहेत. अकॅडमीच्या दर्जेदार शिक्षणामुळे आजपर्यंत जवळपास १०० हून अधिक खेळाडूंची जिल्हा संघात निवड झाली असून काहींची महाराष्ट्र व गोवा संघातर्फे रणजी व राज्यपातळीवर निवड झाली आहे. खेळाडूंच्या सुविधेसाठी ३ आधुनिक ॲस्ट्रो टर्फ खेळपट्ट्या उपलब्ध करण्यात आल्या असून मुंबई व पुणे येथील नामवंत प्रशिक्षकांनाही पाचारण केले जाणार आहे.

Shanti 4

१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपस्थिचे आवाहन

शिबिरात क्रिकेटचे आधुनिक तंत्र शिकवण्यावर, फिटनेसवर भर देण्यासोबतच सराव सामने घेतले जाणार आहेत. इच्छुकांनी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता स्टेडियमवरील मैदानावर उपस्थित राहावे किंवा अधिक माहितीसाठी अकॅडमीचे सचिव व प्रशिक्षक श्री. दीपक देसाई (मो. ९८९०४५७९७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्रशेठ पाथरे यांनी केले आहे.