कळंबस्ते पुलावर सुरक्षेचा प्रश्न गंभीर; दुर्घटनेची शक्यता व्यक्त
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील Mumbai Goa Highway चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत रेलिंग बसवणे अत्यंत आवश्यक बनले आहे। पुलावर पुरेशा सुरक्षिततेची व्यवस्था नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण व अधिकाऱ्यांनी तातडीने या पुलावर रेलिंग बसवावे, अशी मागणी शासनमान्य भटक्या विमुक्त जातीचे अशासकीय सदस्य अशोक पवार यांनी केली आहे।
*रात्रीच्या वेळी अन् पावसाळ्यात अपघाताचा मोठा धोका
*
मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वरदळ असते। कळंबस्ते येथील पुलावरून वाहने जात असताना चालकाचा ताबा सुटणे, वाहन घसरणे किंवा अन्य कारणाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत पुलाच्या बाजूला मजबूत रेलिंग नसल्यास मोठे वाहन थेट खाली कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे।
विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळी वातावरणात वाहनचालकांना रस्त्याचा आणि पुलाच्या कड्यांचा अंदाज घेणे कठीण होते। त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक त्या तांत्रिक निकषानुसार मजबूत संरक्षक रेलिंग, दिशादर्शक फलक आणि रात्री स्पष्ट दिसतील असे सुरक्षा संकेत तातडीने बसवावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे।

बहादूरशेख पुलाच्या दुतर्फा पथदीप लावण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्टी नदीवरील नवा पूल (बहादूरशेख पूल) पूर्ण होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप या पुलावर रेलिंग लावण्यात आलेले नाही। याशिवाय पुलाच्या दुतर्फा पथदीपांची (स्ट्रीट लाईट्स) कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। उड्डाणपुलाला जोडणाऱ्या या वाशिष्टी पुलाच्या दुतर्फा तातडीने पथदीप लावावेत आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा देखील अशोक पवार यांनी प्रशासनाला दिला आहे।













