Finolex CSR Initiative: मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीत १९ अंगणवाड्यांचे नूतनीकरण; २ नूतनीकरण अंगणवाड्यांचे लोकार्पण

Finolex CSR Initiative: मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीत १९ अंगणवाड्यांचे नूतनीकरण; २ नूतनीकरण अंगणवाड्यांचे लोकार्पण

गोळप-दाभिळवाडी व कोळंबे-बागवाडीतील बालकांसाठी स्वच्छ आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील लहान बालकांना सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात अंगणवाडी नूतनीकरणाचा उपक्रम Finolex CSR Initiative वेगाने राबवला जात आहे। या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण १९ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे। यातील तिसऱ्या टप्प्यांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गोळप-दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील २ नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे नुकतेच भव्य लोकार्पण करण्यात आले।

फिनोलेक्सच्या ४५ व्या वर्षांनिमित्त छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून उपक्रम

फिनोलेक्स कंपनीच्या ४५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे। मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रकल्प राबवला जात आहे।

Lok. Tilak hospi.

या नूतनीकरण प्रक्रियेत आवश्यक बांधकाम दुरुस्ती, पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा, आकर्षक रंगकाम, ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या ‘बोलक्या भिंती’, तसेच आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामुळे अंगणवाड्यांचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि बालमैत्रीपूर्ण झाला आहे।

बालकांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती

अंगणवाडी ही बालकांच्या शिक्षणाची आणि सामाजिक जडणघडणीची पहिली पायरी मानली जाते। या प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्या व दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या अंगणवाड्यांचा कायापालट करून ग्रामीण भागातील बालकांना शिक्षणासाठी अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आकर्षक बोलक्या भिंती आणि सुधारित सुविधांमुळे बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे।

मान्यवरांची उपस्थिती आणि ग्रामस्थांचा उत्साह

या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सावंत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे इसीएफ (ECF) प्लांट हेड नामदेव देशमुख, सागर चिवटे, विकास कुरतडकर, तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे शामराव निंबाळकर आणि वरद गोरे उपस्थित होते। याशिवाय स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले।