Goa Ironman 70.3 Ratnagiri : रत्नागिरीच्या डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी फडकवला ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ वर यशोध्वज

Goa Ironman 70.3 Ratnagiri : रत्नागिरीच्या डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी फडकवला 'गोवा आयर्नमॅन ७०.३' वर यशोध्वज

जगातील सर्वात खडतर आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन अवघ्या ७ तास २ मिनिटांत केली फत्ते

रत्नागिरी:

आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन एशिया समितीच्या अंतर्गत आयोजित आणि जगातील सर्वात आव्हानात्मक एकदिवसीय ट्रायथलॉन मानल्या जाणाऱ्या ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ (Goa Ironman 70.3) या स्पर्धेत रत्नागिरीच्या सुपुत्रांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. रत्नागिरी सायकलिंग क्लब व निश्चय वेलनेसचे संस्थापक डॉ. नितीन सनगर आणि आरसीसी व निश्चयचे सदस्य राहुल भोसले यांनी ही अतिशय कठीण स्पर्धा अवघ्या ७ तास २ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या यशाने त्यांनी रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

६८ देशांतील ३,५०० हून अधिक खेळाडूंचे आव्हान
या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील ६८ देशांमधून ३,५०० हून अधिक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या महाकठीण स्पर्धेत खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची पराकाष्ठा पाहणारे ३ टप्पे समाविष्ट होते:

Swami swaru. Pat.

१.९ किमी ओपन वॉटर स्विमिंग: समुद्राच्या उसळत्या लाटांवर मात करत पोहणे.

९० किमी सायकलिंग: तीव्र चढ-उतार असलेल्या खडतर मार्गांवर सायकल चालवणे.

२१.१ किमी हाफ मॅरेथॉन: दमछाक करणाऱ्या कोस्टल रस्त्यांवर धावणे.

किंचितशी चूक ‘पेनल्टी’ किंवा ‘डीएनएफ’ (डीड नॉट फिनिश) ठरवणाऱ्या या स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी अचूक नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर विजय मिळवला.

डॉ. नितीन सनगर व राहुल भोसले यांची उल्लेखनीय क्रीडा कामगिरी
डॉ. नितीन सनगर यांची ही चौथी ट्रायथलॉन, ७०.३ फॉरमॅटमधील तिसरी आणि अधिकृत ‘आयर्नमॅन’ म्हणून पहिलीच स्पर्धा ठरली. यापूर्वी त्यांनी सुपर रँडोनियर सायकलिंग, सलग तीन वर्षे ‘टाटा फुल मॅरेथॉन’ आणि सलग तीन वर्षे ‘सातारा हिल मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण केले असून सातारा हिल मॅरेथॉनमध्ये त्यांनी ‘सब २’ वेळेसह सुवर्णपदक मिळवले होते. त्यांना कोल्हापूर येथील ‘अर्हता’चे पंकज राउळू यांचे प्रशिक्षण लाभले.

तर राहुल भोसले यांनी यापूर्वी दुबईतील १० किमी ‘ओशन मॅन’ ओपन वॉटर स्विमिंग, मालवण येथील ‘लोह पुरुष’ राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा यांसह अनेक मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी गोवा आयर्नमॅन ७०.३ ची तयारी डॉ. नितीन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. या ऐतिहासिक यसाबद्दल दोन्ही खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.