रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय; वैद्यकीय ग्राउंड आणि साक्षीदार फिरल्याचा युक्तिवाद फेटाळला
Journalist Shashikant Warishe Murder Case बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा एकदा मोठे यश अपयश आले आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जामिनासाठी आंबेरकर याने तब्बल ४९ परिच्छेदांचा सविस्तर अर्ज दाखल केला होता, मात्र बचाव पक्षाचे विविध युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत.
अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, कोडवली येथील हॉटेल सरस्वतीजवळ पंढरीनाथ आंबेरकर याने आपली महिंद्रा थार गाडी विरुद्ध दिशेने चालवत शशिकांत वारीशे यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांचा कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. वारीशे यांनी आंबेरकर यांच्या विरोधात तसेच रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित आरोपांवर आधारित लेख प्रसिद्ध केला होता. या लेखातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
Journalist Shashikant Warishe Murder Case: बचाव पक्षाचे युक्तिवाद आणि न्यायालयाचे निरीक्षण
जामीन अर्जामध्ये आंबेरकर याने आपल्या विविध आजारांचा (मधुमेह, उच्च रक्तदाब, अँजिओप्लास्टी, पित्ताशयाचे विकार, मूळव्याध आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार) पाढा वाचत खासगी रुग्णालयात उपचारांची मागणी केली होती. तसेच खटल्यातील २८ साक्षीदारांपैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह काही साक्षीदार प्रतिकूल (फिर्ल्याने) झाल्याने पुरावा कमकुवत झाल्याचा दावा केला होता.

मात्र, सरकारी पक्षाने तीव्र विरोध करताना खालील मुद्दे मांडले:
खटल्यातील अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप नोंदवायची बाकी आहे.
आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा धमकावले जाण्याची दाट शक्यता आहे.
आंबेरकर याच्यापासून जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करणारे तब्बल ४७ अर्ज स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सादर केले आहेत.
रिफायनरी परिसरातील जमिनींचे व्यवहार आणि आरोपीची राजकीय क्षेत्रातील ओळख पाहता साक्षीदारांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, साक्षीदार प्रतिकूल झाले म्हणून संपूर्ण खटला संपुष्टात येत नाही. तसेच आरोपीच्या आजारपणावर यापूर्वीही उपचारांची संधी दिली असून भविष्यातही पोलीस बंदोबस्तात खासगी रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करता येऊ शकते. प्रकरणाचे गांभीर्य आणि साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन न्यायालयाने आंबेरकर याचे निशाणी क्रमांक ३१९ आणि ३२८ वरील दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले.













