जाकीमिऱ्या-अलावा परिसरातील घटना; पतीच्या तक्रारीवरून पोलिस तपास सुरु
Ratnagiri Woman Kidnapping Case बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेचे अपहरण झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास शहराजवळील जाकीमिऱ्या-अलावा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश भिकाजी तांडेल (वय ५१, रा. जाकीमिऱ्या अलावा, तळेकरवाडी, रत्नागिरी) यांची पत्नी सौ. श्रावणी योगेश तांडेल (वय ३८) या रविवारी दुपारी घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. अखेर याप्रकरणी पती योगेश यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली, ज्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस अंमलदार करत आहेत.














