Nakhare Well Drowning : नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू; पूर्णगड पोलिसांकडून तपास सुरू

Nakhare Well Drowning : नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू; पूर्णगड पोलिसांकडून तपास सुरू

गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत; पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वीच मृत्यू

Nakhare Well Drowning: रत्नागिरी तालुक्यातील नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून एका ३३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३ वर्षे, रा. नाखरे बोरभातलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव असून, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे नाखरे परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आडविलकर या गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली होत्या. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मानसिक तणावाच्या स्थितीत त्या घराबाहेर पडून विहिरीच्या दिशेने गेल्या होत्या. यावेळी तोल गेल्याने किंवा अनावधानाने त्या विहिरीच्या पाण्यात पडल्या.

ही बाब कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत प्रियांका यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

Amey jwelrs

मात्र, पावस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तपासणी करून प्रियांका यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेबाबत मृत तरुणीचे वडील लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पोलिसांना अधिकृत माहिती दिली.

पावस प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे पूर्णगड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू (अ.मृ. क्रमांक ४१/२०२६) म्हणून प्रकरण दाखल केले असून, घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.