Malabar Group Ratnagiri: मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त भाट्ये बीच आणि झरी विनायक मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

Malabar Group Ratnagiri: मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त भाट्ये बीच आणि झरी विनायक मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा पर्यावरणपूरक उपक्रम; देशभरातील ९,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि येत्या वर्षभरात १ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

रत्नागिरी: Malabar Group Ratnagiri शोरूमच्या वतीने मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीतील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या भाट्ये बीच आणि झरी विनायक मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन (ESG) या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशभरात राबविण्यात येत असलेल्या महाअभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक प्रशासन, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्वच्छता अभियानात रत्नागिरी शोरूमचे प्रमुख, व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करत समुद्रकिनारा आणि मंदिर परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छतेचा संदेश दिला. रत्नागिरीतील पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही ठिकाणांचे पावित्र्य व सौंदर्य जपण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला. देशभरातील मलाबार ग्रुपच्या विविध शाखांमधील ९,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रव्यापी स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले आहे.

पर्यावरणीय संवर्धनाबाबत ग्रुपची भूमिका स्पष्ट करताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी सांगितले की, पर्यावरणाप्रती जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक प्रशासन या मूल्यांचा कार्यपद्धतीत समावेश करून ESG तत्त्वांना अधिक बळकटी देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. याच पर्यावरणीय शाश्वततेच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या वर्षभरात देशभरात सुमारे १ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ग्रुपने निश्चित केले आहे.

Bane School

व्यावसायिक यश संपादन करत असतानाच मलाबार ग्रुप समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘हंगर फ्री वर्ल्ड’ हा भूकमुक्ती उपक्रम, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मायक्रो लर्निंग सेंटर्स, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच ज्येष्ठ महिलांसाठी ‘ग्रँडमा होम्स’ यांसारख्या लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत विकासाप्रती ग्रुपची बांधिलकी अधोरेखित होते.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची पार्श्वभूमी
१९९३ मध्ये स्थापन झालेली मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही मलाबार ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. ९.४१ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या वार्षिक उलाढालीसह ही कंपनी जागतिक स्तरावरील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी ज्वेलरी रिटेल कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचे १४ देशांमध्ये ४५० हून अधिक शोरूम्सचे विस्तृत जाळे असून भारत, मध्य पूर्व, आशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे कार्यालये व उत्पादन सुविधा कार्यरत आहेत. ३,५०० हून अधिक भागधारकांच्या मालकीच्या या समूहात २६ हून अधिक देशांतील ३०,००० पेक्षा जास्त व्यावसायिक कार्यरत आहेत.