Dabhol Dapoli News: दाभोळ-दापोली मार्गावर रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

Dabhol Dapoli News: दाभोळ-दापोली मार्गावर रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कारवाई; सार्वजनिक रस्त्यावर वाहन बेवारस व अयोग्य पद्धतीने उभी केल्याप्रकरणी नोंद

दाभोळ: Dabhol Dapoli Road Rickshaw Parking या प्रकरणाअंतर्गत दाभोळ ते दापोली जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी किशोर दत्ताराम तेलप (वय ४४, रा. दाभोळ, ता. दापोली) याच्याविरुद्ध दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आरोपीने आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच ०८ आर ९७७३) सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे उभी केली होती की, त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा व धोका निर्माण होत होता. याप्रकरणी सार्वजनिक सुरक्षिततेला व वाहतुकीला बाधा आणल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Shanti 3