Kho-Kho Tournament: लांजा येथे झालेल्या आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगरचे दुहेरी अजिंक्यपद; यजमान कोकण विभाग उपविजेता

Kho-Kho Tournament: लांजा येथे झालेल्या आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगरचे दुहेरी अजिंक्यपद; यजमान कोकण विभाग उपविजेता

मुले व मुलींच्या दोन्ही गटांत मुंबई उपनगर अव्वल, तर ठाणे विभाग तृतीय; स्पर्धेतून निवडला जाणार मुंबई विद्यापीठाचा संघ

Kho-Kho Tournament संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मुंबई विद्यापीठ आणि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेत मुंबई उपनगर विभागाच्या संघांनी वर्चस्व गाजवले आहे. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या मुले व मुलींच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत अजिंक्यपद पटकावले, तर यजमान कोकण विभागाने दोन्ही गटांत द्वितीय क्रमांक मिळवला आणि ठाणे विभागाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लांजा येथील वंजारे महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण या चार विभागांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. मुलींच्या गटात मुंबई उपनगर विभागाच्या संघाने अव्वल कामगिरी नोंदवली, तर कोकण विभागाच्या मुलींनी ठाणे आणि मुंबई शहर संघांचा पराभव करून उपविजेतेपद पटकावले. विशेषतः मुंबई उपनगर आणि कोकण विभागातील सामना अत्यंत चुरशीचा झाला.

Kho-Kho Tournament मधून मुंबई विद्यापीठाच्या संघाची निवड
या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे मुंबई विद्यापीठाचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या वतीने नियुक्त केलेल्या निवड समितीने अत्यंत चोख कामगिरी बजावली.

Law firm

मुलांच्या गटासाठी निवड समिती: अध्यक्ष म्हणून राहुल अकुल यांनी, तर सदस्य म्हणून प्रशांत पाटणकर, शशांक उपशेटे आणि डॉ. नरेंद्र कुंदर यांनी काम पाहिले.

मुलींच्या गटासाठी निवड समिती: अध्यक्षपदाची जबाबदारी शशांक उपशेट्ये यांनी सांभाळली, तर श्रीमती रोहिणी डोंबे, प्रशांत पाटणकर आणि डॉ. नरेंद्र कुंदर यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.

उद्घाटनावेळी मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आमदार किरण सामंत यांच्यासह न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष जयवंत भाऊ शेटे, उपाध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप, सेक्रेटरी महेश सप्रे, संस्थेचे सीईओ भाऊसाहेब वंजारे आणि संचालक मंडळातील संजय तेंडुलकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.