लांजा : विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळावा तसेच त्यांचे इतर शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करेन. येत्या कॅबिनेटमध्ये वाढीव टप्पा अनुदान मिळवून देण्यासाठी या राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे दिले.
रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांची लांजा येथील कार्यक्रमात भेट घेऊन विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विनाअनुदान शाळा कृती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, सचिव प्रकाश हरचेकर, कृती समितीचे कुणाल कदम आदी शेकडो शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांना गेली अनेक वर्षे तुटपुंजा पगार मिळतोय. १२ जुलैला सरकारने अंशतः अनुदानित शाळांसाठी वाढीव टप्पा अनुदान जाहीर केले होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले आहे. हक्काचे अनुदान मिळत नसल्याने हे सगळे शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदान व कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालय येथे बसले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रास्ता रोको, तसेच अनेक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 25/Sep/2024